मृत्यूनंतरही शरीराची होते हालचाल ! संशोधकांचा दावा

1331
फोटो प्रातिनिधीक

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही विज्ञानासमोर मृत्यू हे न उलगडलेल रहस्य आहे. मृत्यूनंतर नेमक काय होतं हे जाणून घेण्यासाठी जगभरातील संशोधक रात्रंदिवस संशोधन करत आहेत. पण ऑस्ट्रेलियातील एका संशोधकाने मृत्यूनंतरही शरीर वर्षभर हालचाल करते असा दावा करुन सर्वत्र खळबळ उडवली आहे. एलिसन विल्सन असे त्याचे नाव आहे.

या संशोधनासाठी एलिसन आणि त्यांच्या टीमने तब्बल 17 महिने एका मृतदेहाच्या हालचाली टिपल्या. त्या मृतदेहावर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आला होता. त्या विशेष खोलीत सीसीटीव्ही लावण्यात आले होते. दिवसभरात एलिसन यांची टीम दर 30 मिनिटांनी त्या मृतदेहाचे फोटो काढायची. जेणेकरून मृतदेहातील बदल तपासणे सहज शक्य होईल. एलिसन व त्यांच्या टीमने तब्बल 17 महिने हा क्रम सुरू ठेवला होता. त्यानंतर हे फोटो तपासण्यात आले. त्यावेळेस जे काही एलिसन व टीमच्या नजरेस पडले ते बघून त्यांना धक्का बसला. कारण या 17 महिन्यात मृतदेहाला कोणीही स्पर्श केलेला नव्हता. तो आहे त्याच ठिकाणी असणे अपक्षित होते. पण तसे झालेले नव्हते. मृतदेह रोज थोड्या थोड्या अंतराने मुळ जागेपासून पुढे सरकत होता. म्हणजेच सुक्ष्म गतीने त्याची हालचाल सुरू होती. असा दावा एलिसनने केला आहे.

मृतदेहाचा एक हात शरीराच्या खाली दबलेला होता. तो बाहेर आल्याचे सीसीटीव्हीत व फोटोत दिसत होते. ही हालचाल मृतदेह कुजण्याच्या सुरुवातीपासून सुरू झाली होती. पहिल्यांदा हे अजब पाहिल्यानंतर मृतदेह सडत असल्याने असे होत असेल असे एलिसन आणि टीमला वाटले. पण मृतदेह सडण्यापासून तो सुकेपर्यंत हालचाल करत असल्याचे त्यांना फोटोमधून निदर्शनास आले. दरम्यान, मृत्यूनंतर शरीर जरी निर्जिव होत असले तरी त्यातील अवयव मात्र मंदगतीने काम करणे बंद करतात. यामुळे मृत्यूनंतरही अनेक तास शरीरातील अवयव कार्य करत असतात. यात हृदय, किडनी, फुफ्फुस हे अवयव मृत्यूनंतर 6 तास काम करत असतात.

आपली प्रतिक्रिया द्या