बिस्किटमध्ये आढळली पाल, लहान मुलीची बिघडली तब्येत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

मुझफ्फरपुरमध्ये एका बिस्किटात पाल आढळली आहे. हे बिस्कीट खाल्याने एक लहान मुलगी आजारी पडली असून तिला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या बिस्किट कंपनीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.

मायरा या अडीच वर्षाच्या मुलीला तिच्या आईने दूध आणि बिस्कीट दिले होते. बिस्कीट खाल्यानंतर मायराची तब्येत बिघडली. तिला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल कराण्यात आले. जेव्हा कुटुंबीयांनी ते बिस्कीट पाहिले तेव्हा त्यात अर्धवट पाल आढळली. सकाळीच हे बिस्कीटचे पाकीट दुकनातून आणले होते. हे बिस्कीट मोठ्या कंपनीचे आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मायराला बिस्कीट खाल्यानंतर उल्टी आणि पोटदुखीचा त्रास झाला. तिच्यावर उपचार केले असून तिची प्रकृती स्थिर आहे.

मायराच्या कुटुंबीयांनी या बिस्कीट कंपनीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. अन्न सुरक्षा विभाग या प्रकरणी तपास करून पुढील कारवाई करेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.