भाजप मंत्र्याच्या घरी कार्यकर्त्याचा मृतदेह

भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या मुलाच्या घरी विनय श्रीवास्तव या भाजपच्याच एका कार्यकर्त्या तरुणाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. गोळी लागल्यामुळे विनयचा मृत्यू झाला असून, कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याचा घनिष्ट मित्र असलेला विनय विकास यांच्या कुटुंबीयांसमवेत या घरीच राहात होता. पोलिसांनी घटनास्थळावरून विकासचे परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे. मात्र, हे पिस्तूल विनयपर्यंत कसे पोहोचले, त्याने गोळी झाडली की दुसऱ्या कुणी गोळी चालवली, तिथे कुणी बाहेरची व्यक्ती आली होती का आणि ही हत्या की आत्महत्या…? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाले आहेत.