
जम्मू आणि कश्मीरमधील गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये हिमस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. विदेशी पर्यटकांच्या एका गटातील दोन पॉलिश नागरिकांचा मृत्यू झाला असून 19 जणांना वाचवण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अफारवट शिखरावर आज दुपारी हिमस्खलन झाले. बचावकार्य सुरू असल्याचे बारामुल्ला पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळावरील एका व्हिडीओत बर्फाचे लोट खाली येताना दिसत असून पर्यटकांमध्ये घबराट पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
Rescue ops at Gulmarg avalanche, Baramulla police teams along with others on job.Sofar 19 foreign nationals have been rescued successfully
Deadbodies of 2 foreign nationals recovered being shifted to hospital for medicolegal procedures.@JmuKmrPolice @KashmirPolice pic.twitter.com/GetUIrbPPG— Baramulla Police (بارہمولہ پولیس) (@BaramullaPolice) February 1, 2023
‘गुलमर्गमधील हिमस्खलन झालेल्या ठिकाणी बचाव कार्य, बारामुल्ला पोलीस दल आणि इतर बचाव यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे. आतापर्यंत 19 परदेशी नागरिकांना यशस्वीरित्या वाचवण्यात यश आले आहे. 2 परदेशी नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना वैद्यकीय कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे’, असे पोलिसांनी सांगितले.


























































