यवतमाळ : कुलरचा शॉक लागल्याने 3 बहिणींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलरचा शॉक लागल्याने 3 बहिणींचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कोधुर्ली येथे घडली आहे. गजानन भुसेवार यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

डॉक्टरांनी मोबाईल वापरू नको सांगितल्याने मुलीची आत्महत्या

रिया ,संचिता व मोना या तिघीजणी घरीच होत्या. त्यांचे आईवडील सकाळीच शेतात निघून गेले होते. घरात सकाळी जेवण करत असताना एक मुलगी कुलर सुरू करण्यासाठी गेली. तिला शॉक लागल्यावे ती चिकटून बसली होती. तिला काय झाले हे पाहायला गेलेल्या इतर दोन बहिणींनाही शॉक लागला आणि त्यांचाही मृत्यू झाला.

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या माजी आमदाराला अटक

या घटनेमुळे कोधुर्ली गावातील रहिवाशांना धक्का बसला आहे. तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि मुलींच्या आईवडीलांची विचारपूस केली. यवतमाळमधील मुक्त पत्रकार सदीप धानफुले यांनी या बातमीसाठीची माहिती पाठवली आहे.