डेक्कन क्वीनला 93 वर्षे पूर्ण झाली; प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद

महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ ची सुरुवात हा मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. राज्यातील 2 महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी 1 जून 1930 रोजी ही पहिली डिलक्स ट्रेन सुरू करण्यात आली होती.त्याला डेक्कन क्वीन म्हणजेच ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असेही म्हटले जाते. या ट्रेनने 93 वर्षांचा सेवा बजावण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. ही ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे.

सुरुवातीला ही ट्रेन प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह चालवण्यात आली होती. त्यापैकी एक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसरी सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगाने रंगवलेला होता. मूळ रेकच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्स इंग्लंडमध्ये बांधण्यात आल्या होत्या तर कोचच्या बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये बांधण्यात आल्या होत्या. डेक्कन क्वीनमध्ये सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती. 1 जानेवारी 1949 रोजी प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली आणि द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली, जी जून 1955 पर्यंत सुरू होती. त्यानंतर या ट्रेनमध्ये प्रथमच तृतीय श्रेणी सुरू करण्यात आली.

मूळ रेकचे डबे 1966 मध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर येथे बांधलेले अँटी-टेलिस्कोपिक स्टील बॉडीच्या इंटिग्रल कोचेस मध्ये बदलण्यात आले. या डब्यांमध्ये उत्तम आरामदायी प्रवासासाठी बोगींचे सुधारित डिझाइन आणि आतील सजावट आणि फिटिंग्जमध्ये सुधारणा समाविष्ट केल्या आहेत. अधिक क्षमता वाढविण्यासाठी रेकमधील डब्यांची संख्या देखील मूळ 7 डब्यांवरून वाढवून 12 करण्यात आली होती. कालांतराने ट्रेनमधील डब्यांची संख्या सध्याच्या 17 डब्यांच्या पातळीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

डेक्कन क्वीनचा इतिहास दोन शहरांची कहाणी आहे. डेक्कन क्वीनच्या वेळेवर निघून वेळेवर पोहोचण्याच्या अचूक रेकॉर्डमुळे दोन्ही शहरांतील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे सर्व पारंपरिक डबे एलएचबी कोचने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. LHB कोचची सुधारित रचना असलेली ट्रेन सुरू करण्यात आली आहे.