
केंद्र सरकारने डीपफेक व्हिडीओबाबत आता कठोर पावले उचलली आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डिपफेक व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांसाठी 36 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. फेसबुक, गुगल आणि युट्युबवरुन डीपफेक व्हिडीओ न हटवल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराच दिला आहे.
केंद्रिय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, हा फार गंभीर विषय आहे. हिंदुस्थानाील कोट्यावधी नेटकऱ्यांसाठी ही एक जोखीम आहे. त्यामुळे विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन डिपफेक व्हिडीओ अपलोड केले त्यांच्यासाठी 36 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. सोशल मीडिया युजर्सना सुरक्षित माहोल देण्यात यावा असा इशारा देण्यात आला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत जे सोशल मीडिया असे करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हिंदुस्थानच्या कायद्यानुसार स्पष्ट आहे की, त्यांचे युजर्स जो कंटेन्ट शेअर करतात त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.
डीपफेकचा गंभीर धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 24 नोव्हेंबर रोजी सर्व समाज माध्यमांना बोलावले आहे. यावेळी डीपफेक व्हिडिओंवर तात्काळ कारवाई केली जाईल. पुढे ते म्हणाले, जर कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर डीपफेक व्हिडीओ अपलोड केला असेल तर तो 36 तासांच्या आत हटविण्यात यावा. व्हिडीओ न हटविल्यास संबंधित व्यक्ती न्यायालयात धाव घेऊ शकते आणि असे करणाऱ्यांविरोधात खटला चालवू शकते. एवढेच नाही व्हिडीओ आढळल्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्मही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात.
























































