दीपिकाच्या स्पोट्र्स कलेक्शनचा लिलाव, जमलेला निधी देणार एनजीओला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
deepika-padukone

अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली होती. अभिनेता प्रभाससोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आता दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आलेय, ते तिच्या स्पोर्टस् प्रेमामुळे! राष्ट्रीय खेळ दिनाचे औचित्य साधून काल दीपिकाने तिच्याजवळ असलेल्या खेळाशी संबंधित वस्तूंचा लिलाव सुरू केला आहे. यातून जमा होणारा निधी ती तिच्या ‘द लाइव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन’ या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्य़ा संस्थेसाठी देणार आहे. याबाबतची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे. तसेच तिने तिच्या स्पोर्टस्वेअरचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

दीपिकाच्या वैयक्तिक संग्रहातून निवडक कपडे तसेच खेळाचे कपडे, खेळ साधने यांचा समावेश असणार आहेत. स्टेपल टीजपासून परफॉर्मन्स ओप्टीमायझिंग वर्कआउट साधनं असा हे ‘स्पोर्टस् एडिट कलेक्शन’ आहे. यामध्ये काही लिमिटेड एडिशन स्नीकर्सदेखील आहेत. ते चाहत्यांना सर्वाधिक पसंत पडण्याची शक्यता आहे.

दीपिका फिटनेसप्रेमी आणि क्रीडाप्रेमी आहे. ती चाहत्यांना स्वस्थ राहण्यासाठी प्रेरित करते. सध्या ऑनलाईन लिलावाच्या निमित्ताने तिने हाच संदेश चाहत्यांना दिला आहे. हे कलेक्शन 29 ऑगस्टपासून DeepikaPadukone.com/Closet वर उपलब्ध होणार आहे.