त्या ड्रग्ज ग्रुपची ऍडमिन दीपिका पदुकोण, एनसीबीच्या चौकशीत माहिती उघड

बॉलिवुडमधील कलाकारांचे ड्रग्ज कनेक्शन ज्या व्हॉटस ऍप ग्रुपमुळे समोर आले आहे. त्या व्हॉटस ऍप ग्रुपची ऍडमिनच अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याची धक्कादायक माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी)चौकशीत समोर आली आहे. या ग्रुपमध्ये दीपिकाचे मॅनेजर करिश्मा प्रकाश, जया साहा यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, एनसीबीने शुक्रवारी करिश्मा हिची चौकशी केली असून अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची शनिवारी चौकशी होणार आहे.

एनसीबीने आज अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचीदेखील चौकशी केली आहे. या चौकशीत तिने आपण रिया चक्रवर्ती हिच्याशी ड्रग्ज संदर्भात बोलणी केले असल्याचे मान्य केल्याचे कळते. तर आपल्याकडे ड्रग्ज ठेवण्यात आले होते. परंतु आपण त्याचे सेवन केले नसल्याची माहिती तिनी चौकशी दरम्यान एनसीबीला दिली आहे. तर हे ड्रग्ज रियासाठी असल्याची माहिती तिने यावेळी दिली. या चौकशी दरम्यान बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी समोर आलेल्या बॉलिवुडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या