कलाकरांना मूर्ख समजणं बंद करा, दीपिका नेटकऱ्यांवर संतापली

deepika-padukone

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वजण घरात थांबून आपापल्या परीने एकमेकांना मदत करत आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. तेही जनतेत कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत.

मात्र, तरीही कलाकार काही ना काही कारणावरून ट्रोल होत आहेत. या ट्रोलिंगवरूनच अभिनेत्री आणि निर्माती दीपिका पदुकोण ही सुद्धा संतापली आहे. लोकांनी कलाकारांना, सेलिब्रिटीजना मुर्ख समजणं थांबवायला हवं, अशा शब्दात तिने सडेतोडपणे आपलं मत मांडलं आहे. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने आपलं मनोगत व्यक्त केलं.


View this post on Instagram

Season 1:Episode 3 #drinkjuice #eatfruit Productivity in the time of COVID-19!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

तिला लॉकडाऊन स्थितीत मानसिक आरोग्य जपण्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. घरी राहिल्यामुळे दीपिका स्वतःसुद्धा स्वयंपाक, घरची आवराआवर, साफसफाई अशा गोष्टींकडे लक्ष देत आहे. डिप्रेशनसारख्या मानसिक आजारातून बरं झाल्यामुळे लॉकडाऊन स्थितीत शांत राहणं तिच्यासाठी कठीण नसल्याचं तिने सांगितलं. यानंतर तिला कलाकारांच्या वर्तनाविषयी विचारण्यात आलं. काही माध्यमांनी अशा महामारीच्या काळात सेलिब्रिटींनी आपलं तोंड बंद ठेवावं आणि आपलं मत जाहीर करू नये, असं म्हटलं होतं. त्याविषयी तिचं मत काय हे तिला विचारण्यात आलं.

त्यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली की, मला वाटतं वेगवेगळी माणसं अशा प्रकारच्या परिस्थितीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. लोकांना कलाकार मूर्ख असल्याचं वाटतं. असा विचार करणं त्यांनी थांबवायला हवं. आम्ही बहुतेक सगळे चांगला विचार करणारी आणि समजुतदार मंडळी आहोत. आम्हाला कळतंय की आसपास काय सुरू आहे आणि त्याचं गांभीर्य किती आहे. आम्ही सगळेच घरी थांबलो आहोत. सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत आणि ही आमची जबाबदारी असल्याने ती काटेकोरपणे पाळत आहोत. यापलिकडे आम्ही काय करू शकतो?, अशा शब्दांत दीपिकाने परखडपणे तिचं मत व्यक्त केलं आहे.


View this post on Instagram

Season 1:Episode 4 Two Two…ChaChaCha Productivity in the time of COVID-19! #exercise

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

पुढे ती म्हणाली की, या काळात सर्वांना प्रेमाची आणि सहानुभूतीची गरज आहे आणि सगळेच ती एकमेकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर काय पोस्ट केलं जातं, त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही काय करायचं हे तुमच्या विचारांवरच सर्वस्वी अवलंबून आहे, असंही दीपिका यावेळी म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या