अशी साजरी करणार दीपिका लग्नानंतरची पहिली दिवाळी

1453

अभिनेत्री दीपिका पादुकोणने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेता रणवीर सिंग सोबत लग्नाची गाठ बांधली होती.  यावर्षी दीपिका तिची लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे ही दिवाळी दीपिका कशी साजरी करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दीपिकाच्या छपाक या चित्रपटाची शूटींग नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या दीपिका निवांत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी तिने कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिका तिच्या माहेरच्या व सासरच्यांसोबत ती वेळ घालवणार आहे. “कौटुंबिक वेळ फार महत्वाचा आहे. आम्हा दोघांनाही कुटुंबासोबत सण साजरे करायला आवडतात. त्यामुळे यंदा आम्ही दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणार आहेत. त्या काळात आम्ही दोघांनीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे ” असे दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले.

दीपिका आणि रणवीरचे गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमो रिसॉर्टवर लग्न झाले होते. परदेशातही या दोघांनी पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई दिल्ली बंगळुरू या ठिकाणी रिसेप्शन ठेवले होते. त्यांच्या लग्नातले या दोघांचेही सर्व लूक एकदम हिट ठरले होते.

आपली प्रतिक्रिया द्या