दीपिका-रणवीरने लग्नाचा पहिला वाढदिवस ‘या’ ठिकाणी केला साजरा

893

बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. आजच्या दिवशी दीपिका आणि रणवीरचा इटली येथे कोकणी आणि सिंधी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. ‘दीपवीर’ने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस तिरुपती येथे साजरा केला. व्यकटेश्वर मंदिरात जाऊन दीपवीरने भगवान व्यंकटेश्वरांचे दर्शन घेतले. याचा फोटो दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

14 नोव्हेंबर, 2018 ला अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह इटलीत लग्नबंधनात अडकले होते. आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तिरुपती येथे भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनाला पोहोचले. दीपिका लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. दीपिकाने गळ्यात मंगळसुत्र आणि भांगेत कुंकु लावले आहे. तर रणवीर सिंह पांढऱ्या शेरवानीमध्ये दिसत आहे. सोबत गुलाबी रंगाचा दुपट्टा घेतला आहे. मंदिरामध्ये दर्शनानंतर दोघांनी बाहेर येऊन मीडियाला फोटोसाठी पोजही दिली.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर तिरुपती आणि पद्मावतीचे दर्शन घेतल्यानंतर 15 नोव्हेंबरला कुटुंबासोबत सुवर्णमंदिरात दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहेत. याच दिवशी ते मुंबईला परत येतील.

आपली प्रतिक्रिया द्या