अंबानीच्या लग्नात दीपिकाच्या मानेवरील ‘RK’ टॅटू पुन्हा दिसला

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ही जोडी गेल्या महिन्यात लग्नबंधनात अडकली. या दोघांनी इटलीमध्ये हिंदू आणि सिंधी पद्धतीने दोघांनी लग्न केले. लग्नानंतर बेंगळुरुत रिसेप्शन पार पडले, यावेळी सर्वांचीच शोधक नजर दीपिकाच्या मानेवर होती. दीपिकाच्या मानेवर ‘RK’ हा टॅटू लग्नानंतरही आहे की नाही हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. परंतु त्यावेळी टॅटू गायब होता. एक्सच्या आठवणींना दीपिकाने गुडबाय केल्याचे सर्वांना वाटले. परंतु ईशा अंबानीच्या लग्नात दीपिकाच्या मानेवर तो टॅटू पुन्हा दिसल्याने सर्वच बुचकळ्यात पडले.

दीपिका पदुकोण रणवीरसोबत लग्नापूर्वी रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. यावेळी दीपिकाने रणबीरच्या नावाचा टॅटू आपल्या मानेवर गोंदवून घेतला होता. परंतु यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि दीपिकाने हा टॅटू काढून टाकला असे सर्वांना वाटले. परंतु आजही हा टॅटू तिच्या मानेवर तसाच आहे. दीपिका आणि रणवीर दोघांना ईशा अंबानीच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी तिच्या मानेवर तो टॅटू तसाच होता. लग्नात मात्र तिने मेकअपच्या मदतीने तो लपवला असल्याचे चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या