वाजवा रे वाजवा …दीपिका रणवीरचं लग्न ठरलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

पद्मावती फेम दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच लग्न अखेर ठरलं असून पुढील महिन्यात १४ आणि १५ नोव्हेंबरला हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

यासंदर्भात खुद्द दीपिका आणि रणवीरने त्यांच्या टि्वटवरच पत्रक पोस्ट करून ही बातमी अधिकृतपणे जाहीर केली आहे. या पत्रकात त्यांनी आमच्या कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आमचे लग्न ठरल्याचे जाहीर केले आहे. तसेच तुम्ही दिलेल्या प्रेमाबदद्ल आम्ही आभारी आहोत. असे म्हटले असून त्यांच्या पुढील वाटचालीस आशिर्वाद मागितले आहेत.