
मनात जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल तर वय काय चीज आहे. नव्वद वर्षांहून अधिक वय असणाऱ्या आणि या वयातही लेण्याद्री डोंगर पायी चढणाऱ्या आजीबाईकडे बघितले तर याचा प्रत्यय येतो. आजीचे वय आणि डोंगर चढण्याची इच्छाशक्ती पाहून कोणीही थक्क होईल. तिचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तुम्हाला आजी लेण्याद्री डोंगरावर पायी चढताना दिसत आहे. आजीचे गडकिल्ल्याविषयीचे प्रेम अनेकांना प्रेरित करणारे आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आजीला पायऱ्या चढण्यास मदतही करताना दिसतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ‘‘मी या सुपर आजीला भेटलो. त्यांचे वय नव्वद वर्षांपेक्षा जास्त होते. अचानक झालेली ही भेट खरोखर प्रेरणादायक होती’’ अशी कॅप्शन यावर देण्यात आली आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आजीला मानाचा मुजरा’ करण्यात येतोय.