विंग कमांडर अभिनंदनवर येणार चित्रपट

798
wing-commander-abhinandan-v

सामना ऑनलाईन। मुंबई

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्यावर लवकरच चित्रपट येणार आहे. बॉलीवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय याला सर्जिकल स्ट्राईकवर चित्रपट तयार करण्याची परवानगी मिळाली आहे . पुढील वर्षी 2020 पासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये हा चित्रपट झळकणार आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले होते. त्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमधील बालाकोट येथे घूसुन सर्जिकल स्ट्राईक केले. यात दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले. याचदरम्यान हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडला होता. पण त्याने जराही न डगमगता मोठ्या धैर्याने व बहादुरीने परिस्थितीचा सामना केला होता. अभिनंदनच्या या धाडसामुळे त्याला वीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या जाँबाज कमांडरसह सर्वच जवानांचा गौरव करण्यासाठी बॉलीवूडने बालाकोट स्ट्राईकवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे होणार आहे.

एक सच्चा देशभक्त आणि या चित्रपटाशी संबंधित असल्याने हिंदुस्थानी लष्कर किती सक्षम आहे हे दाखवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे विवेक ऑबेरॉयने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या