एम्सला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

348

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश मिळाले आहे. इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

आगीचे वृत्त कळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग वेगाने पसरत असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. त्यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान याच रुग्णालयात माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरू असल्याने आगीचे वृत्त समजताच अनेक राजकीय मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या