हिंदुस्थानी हवाई दलाचे कंत्राट मिळाल्यास ‘एफ-21’ जेट अन्य देशांना विकणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी हवाई दलाने जर 114 ‘एफ-21’ या लढाऊ विमान खरेदीचे कंत्राट दिले तर अन्य कोणत्याही देशांना या विमानांची विक्री आम्ही करणार नाही असे स्पष्टीकरण अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टीनने दिली आहे. लॉकहिडने फेब्रुवारीमध्ये बंगळुरूत झालेल्या ‘एअरो इंडिया शो’ दरम्यान अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टीननेचे अनावरण केले होते.

जर कंपनीला ‘एफ-21’ लढाऊ विमानांचे कंत्राट मिळाले तर हिंदुस्थान लॉकहिड मार्टीनच्या जागतिक लढाऊ विमानांच्या तंत्रज्ञानाचा हिस्सा बनेल अशी माहिती कंपनीचे धोरण आणि व्यावसायिक विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी दिली.

हवाई दलाच्या 60 पेक्षा अधिक तळांवरून परिचालन करण्याच्या दृष्टीने या विमानांचे डिझाईन केले असून सुपिरिअर इंजिन मॅट्रिक्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आणि अधिक शस्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. अशा प्रकारची क्षमता असलेली ‘इ-21’ लढाऊ किमाने अन्य कोणत्याही देशाला देण्यात आलेली नाहीत, असेही विवेक लाल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

दरम्यान, लॉकहिडला हे कंत्राट मिळाल्यास लॉकहिड टाटा समूहासोबत इ-21 अत्याधुनिक निर्माण केंद्रही स्थापन करेल. हिंदुस्थानला संरक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीही त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी हिंदुस्थानी हवाई दलाने 114 लढाऊ जेट विमानांच्या खरेदीसाठी 18 अब्ज डॉलर्सची प्राथमिक निविदा जारी केली होती.

लॉकहिड एफ-21, बोइंगचे एफ/ए-18, दसॉ एक्हिएशनचे राफेल, युरोफायटर टायफून, रशियन लढाऊ किमान मिग-35 आणि ग्रिपेन या कंपन्या हिंदुस्थाचे 114 जेट विमानाचे कंत्राट मिळविण्यास इच्छुक आहेत.

दीर्घपल्ल्याचे इन्फारेड सर्च ऍण्ड ट्रक, ट्रिपल मिसाईल लाँचर, 40 टक्के अधिक युद्धसामग्री घेऊन जाणाची क्षमता, अचूकपणे धोका ओळखणे अशा प्रकारच्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर ‘एफ-21’ या लढाऊ विमानात करण्यात आला आहे.