सुमित्रा महाजन यांच्याऐवजी शंकर ललवानी यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। प्रतिनिधी

तब्बल आठ वेळा लोकसभेची निवडणूक जिंकणाऱया मावळत्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचे तिकीट कापून रविवारी भाजपने अनोळखी असलेल्या शंकर ललवानी यांच्या गळय़ात इंदूरच्या उमेदवाराची माळ घातली.

लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या इंदूर मतदारसंघातील उमेदवारीचा पेच भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झाला होता. भाजप नेतृत्वाने तो अखेर सोडवला. वयाची पंच्याहत्तरी पार केल्याचा दाखला देत सुमित्रा महाजन यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका भाजप नेतृत्वाची होती; मात्र सुमित्रा महाजन निवडणुकीसाठी इच्छुक होत्या. त्यामुळेच तिथला निर्णय पक्षाने लांबणीवर टाकला होता. त्यामुळे संतप्त होऊन सुमित्राताईंनी लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय एका पत्राद्वारे जाहीर केला होता.