
दिल्लीत सोनसाखळी चोरांचा प्रतिकार करणाऱ्या महिलेवर चाकूहल्ला झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. सिमरन कौर असे या महिलेचे नाव होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील आदर्श नगर येथे घडली आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, सिमरन आपल्या दोन वर्षाच्या मुलासह पायी घरी जात होती. त्यावेळी त्याच रस्त्यावर उभ्या एका अज्ञात इसमाने सिमरनने घातलेले दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सिमरनने या चोराचा प्रतिकार केला असता, या चोराने सिमरनवर चाकूने सपासप वार केले. ज्यात ती गंभीर जमखी झाली. या हल्ल्यानंतर या सोनसाखळी चोराने तेथून पळ काढला.
राजधानी दिल्ली में एक बार फिर सनसनीखेज वारदात को अंजाम दिया गया है। गोद में बच्चा लिये घर लौट रही महिला से चेन स्नैचिंग की कोशिश की गई। महिला ने विरोध किया तो स्नैचरों ने चाकू से ताबड़तोड़ वार दिया। महिला को अस्पताल पहुंचाया जहां उसकी मौत हो गई। पूरी घटना CCTV में कैद हो गई। pic.twitter.com/ltrdKHvNvE
— Hindustan (@Live_Hindustan) February 28, 2021
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिमरनला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारदरम्यान तिचा मुत्यू झाला आहे. पोलीस सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीने या सोनसाखळी चोराचा शोध घेत आहेत.




























































