विक्रम लँडरसंदर्भात मोठी बातमी, ‘नासा’ने इस्रोला पाठवला नवा फोटो

1350

चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान 2 च्या ‘विक्रम लँडर’चे अवशेष सापडल्याचा दावा अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) केला आहे. नासाच्या लूनर रिकनेसन्स ऑर्बिटरला (LRO) विक्रम लँडरचे अवशेष सापडले आहेत, असे टि्वट नासाने केले आहे. याचे काही फोटोही नासाने इस्रोला (ISRO) पाठवले असून यात विक्रम लँडरचे अवशेष चंद्रावर विखुरलेले दिसत आहे.

नासाने केलेल्या दाव्यानुसार चांद्रयान-2 चा (chandrayaan 2) विक्रम लँडर ज्या ठिकाणी आदळला तिथून तो 750 मीटर लांब सापडला आहे. यात विक्रम लँडरचे तीन तुकडे झाल्याचे दिसत आहे. नासाने सोमवारी रात्री 1.30 च्या सुमारास विक्रम लँडरचे काही फोटो प्रसिद्ध केले. त्यात विक्रम लँडरचे तीन तुकडे झाल्याचे दिसत आहे. तसेच  विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्याआधीचे व नंतरचे फोटोही नासाने पाठवले आहेत. यात विक्रम लँडर उतरण्याआधीचा चंद्राचा पृष्ठभाग व नंतरचा पृष्ठभाग यातील बदलही नासाच्या लूनर रिकनेसन्स ऑर्बिटरने टिपलेले आहेत. यात जिथे विक्रम लँडर कोसळला त्या ठिकाणची चंद्रावरील माती पसरल्याचे दिसत आहे. इस्रोने नासाकडून विक्रम लँडरची माहिती मागवली होती.

नासाच्या माहितीनुसार विक्रम लँडरचे हे फोटो एक किलोमीटर अंतरावरून घेण्यात आले आहे. इस्रोने नासाला संपर्क केला होता. यावेळी विक्रम लँडरच्या लँडींगचे फोटो इस्रोने मागवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या