
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यात पुन्हा संघर्षाचा भडका उडाला आहे. दिल्लीतील शिक्षकांना फिनलँडला अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला. मात्र सक्सेना यांनी परवानगी दिली नाही. यामुळे केजरीवाल संतप्त झाले. ‘‘मला दिल्लीतील लोकांनी निवडून दिले आहे. दोन कोटी लोकांनी मतदान करून मुख्यमंत्री केले. मग तुम्ही (सक्सेना) कोण आहात? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
नायब राज्यपालांची मानसिकता सरंजामशाही आहे. नायब राज्यपाल कोण? कुठून आले? आमच्या डोक्यावर येऊन बसले आहेत. यांच्यासारख्यांमुळे देश मागे पडत आहे, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.
– भाजपचे खासदार, आमदार, नेत्यांची मुले परदेशात शिक्षणासाठी पाठवता. मग गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी तुम्ही रोखणारे कोण? अशा शब्दात केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला.




























































