नवी दिल्लीत कोरोनाचा फैलाव सुरुच; 24 तासात 1094 नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत कोरोनाचे वेगाने संक्रमण होत आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा दर 4 टक्क्यांवर गेला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 4.82 टक्के आहे.

नवी दिल्लीत शुक्रवारीही एक हजार नवे रुग्ण आढळले होते. तर दोघांचा मृत्यू झाला. शनिवारीही गेल्या 24 तासात 1094 नवे रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रुग्णांनी पुन्हा एकदा एक हजाराचा आकडा पार केला. दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे चिंता व्यक्त होत आहे.

रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढवला आहे. मात्र, घाबरण्याची गरज नसल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निर्बंध लादण्याऐवजी सुरक्षिततेवर भर देत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच मास्क सक्तीचे करण्यात आले असून मास्क नसल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.