निवडणूक आयोगाची पंतप्रधान मोदींना नऊ वेळा क्लीन चिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-new

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

मतदानाच्या दिवशी अहमदाबाद येथे केलेला ‘रोड शो’ आणि कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे केलेल्या भाषणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारी फेटाळून लावल्याने मोदी यांना निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या क्लीन चिटची संख्या नऊवर पोहचली आहे.

अहमदाबादमध्ये 23 एप्रिलला पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये मतदानास गेले होते. त्यावेळी ते उघडय़ा जीपने मतदान करण्यासाठी गेले. मतदानादिवशी ‘रोड शो’ करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. मतदान करण्यास उघडय़ा जीपने जाण्यात काहीच गैर नसल्याचे स्पष्ट करत आयोगाने या प्रकरणात मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे 9 एप्रिल रोजी मोदींनी आपल्या भाषणात बालाकोट येथे हवाई हल्ला करणाऱया शूर जवानांसाठी तुम्ही मतदान करा, असे आवाहन नवमतदारांना केले होते. याबाबत विरोधकांनी शहीद जवानांच्या नावाकर मते मागितल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या प्रकरणातही मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांत यापूर्वी सात केळा क्लीन चिट देण्यात आले आहे. याविषयी काँग्रेसने अनेक प्रश्न निवडणूक आयोगावर पक्षपात केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयातही पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप करत याचिका दाखल केली आहे.