दिल्लीतील अभियंत्याची शिवाजीनगरमधील हॉटेलमध्ये आत्महत्या

suicide

दिल्लीतील एका अभियंत्याने  शिवाजीनगर परिसरातील  एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जितेंद्रकुमार गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्रकुमार गुप्ता नोएडातील एका खासगी कंपनीत कामाला होते. काही दिवसांपुर्वी ते दिल्लीतील राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. दिल्लीतून आल्यानंतर गुप्ता हे शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीत असलेल्या एका हॉटेलमध्ये राहात होते.

रविवारी सकाळी हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कामगाराला दिसून आले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुप्ता यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या