दिल्लीत कारखान्याला भीषण आग, 43 जणांचा मृत्यू

1343

दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडीजवळ एका कारखान्याला भीषण आग लागली असून या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दुर्घटनास्थळावरून 50 लोकांना बाहेर काढण्यात आले असून धुरामुळे या सर्वांची प्रकृती बिघडली आहे. वाचविण्यात आलेल्या सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.


आग लागलेल्या इमारतीतील कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत परसली. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या तब्बल तीस गाड्यांनी घटनास्थली धाव घेतली. ही इमारत एका चिंचोळ्या गलीत असल्याने बचावकार्यात अडथळा येत होता.

आपली प्रतिक्रिया द्या