दिल्लीत कारखान्याला आग, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत पटपडगंज औद्योगिक परिसरातील  एका फॅक्टरीला गुरुवारी सकाळी आग लागली. यात एकाचा होरपळून मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या फॅक्टरीत छपाईची कामे होत असल्याने आगीत सगळीच यंत्रसामग्री जळून खाक झाली आहे. आगीचे नेमके कारम अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पूर्व दिल्लीत पटपडगंज ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे अनेक लहान मोठे कारखाने असून हजारो कर्मचारी येथे दिवस रात्र काम करतात. गुरुवारी सकाळी येथील एका कारखान्याला अचानक आग लागली.

याआधी दिल्लीतील पीरागढी भागातही कारखान्याला अचानक आग लागली. बघता बघता ही आग आजूबाजूच्या परिसरातही पसरली. यावेळी मोठा स्फोट झाला आणि कारखान्याची इमारतच कोसळली होती. यात १८ जण जखमी झाले होते तर अग्निशमनदलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता.