
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या भाडय़ात विक्रमी वाढ झाली आहे. विकेंडला फाईव्ह स्टार हॉटेलचे भाडे 85 हजारांपासून 1.3 लाखांपर्यंत पोहोचले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हिंदुस्थान दौरा या आठवडय़ात दिल्लीतील भारत मंडपममध्ये टॅक्सेशन मीट, यशोभूमी येथे होत असलेले पेपर एक्स्पो कार्यक्रम, युनेस्कोची होत असलेली बैठक आणि दिल्लीत सुरू असलेले अधिवेश यामुळे दिल्लीतील 5 स्टार हॉटेलचे भाडे गगनाला भिडले आहेत. दिल्लीतील ताज पॅलेस, ताज मान सिंह, ओबेरॉय, लीला, आयटीसी मौर्य हॉटेल बुक झाले आहेत.























































