
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची भाषणं मला आवडतात असं म्हणत गडकरी यांनी नेहरूंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भाजप पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्यानेच गडकरी अशी वक्तव्य करीत आहेत अशी चर्चा आता भाजपच्या गोटात रंगली आहे.
गडकरी यांनी हे विधान एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.’देश सुधारण्यासाठी आपण यंत्रणांच्या सुधारणेसाठी दुसऱ्यांकडे बोट का दाखवतो? स्वत:कडे हे बोट का दाखवलं जात नाही? जवाहरलाल नेहरू नेहमी सांगायचे की हिंदु्स्थान हे नेशन नसून पॉप्युलेशन आहे म्हणजेच राष्ट्र नसून लोकसंख्या आहे, या देशातील प्रत्येक व्यक्ती ही देशासमोरची समस्या आहे, प्रश्न आहे. नेहरूंची भाषणं मला आवडतात. यामुळे मी देशासाठी समस्या तर बनणार नाही कारण एवढं मी नक्कीच करू शकतो.’ असं गडकरी यावेळी म्हणाले.
विविधतेत एकता हे हिंदुस्थानचं वैशिष्ट असून आपल्यात विनम्रता असली पाहिजे. चांगले बोलण्याने आपण सगळ्यांना आपलेसे करू शकतो, पण त्यामुळे निवडणुका जिंकू शकत नाही. आपण विद्वान आहोत म्हणून जनतेने तुम्हांलाच मत द्यायला हवीत हे ही गरजेच नाही. आत्मविश्वास व अहंकार यात फरक आहे. आपण आत्मविश्वास बाळगायलाच हवा पण अहंकारापासून दूर राहायला हवं असं गडकरी म्हणाले. गुप्तचर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांचं हे विधान अधिकाऱ्यांसाठी केलं असलं तरी त्याचा अर्थ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाशी जोडला जात आहे.
#WATCH Nitin Gadkari: JL Nehru kehte the, “India is not a nation, it is a population. Iss desh ka har vyakti desh ke liye prashn hai, samasya hai.” Unke yeh bhashn mujhe bahut pasand hain. Toh main itna toh kar sakta hun ki main desh ke saamne samasya nahi rahunga. (24.12) pic.twitter.com/i3QzoqwrLk
— ANI (@ANI) December 25, 2018




























































