बोकडाबरोबर सेल्फी काढणे पडले महाग, दिली धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात बोकडाबरोबर सेल्फी काढण्याचा हट्ट एका तरुणीला चांगलाच महागात पडल्याचा दिसत आहे. सेल्फी काढत असताना बोकडाने तिला जोरदार धडक दिली. ही घटना तरुणीच्या मोबाईलमध्ये कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ बघितला असून तरुणीला अद्दल घडवणाऱ्या बोकडाचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला हे मात्र समजलेले नाही.

बोकडाला दोरीला बांधून ही तरुणी त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होती. यामुळे वैतागलेल्या बोकडाने एकदोनवेळा तिला धडक देण्याचा प्रयत्न केला. पण गळ्यातील दोरी आखूड असल्यामुळे तो तिच्यापर्यंत पोहचू शकला नाही. मात्र सेल्फी काढताना तरुणी मागे सरकली त्यामुळे तिच्यापर्यंत बोकडाला पोहचता आले आणि त्याने सगळा राग तिच्यावर काढत तिला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात तरुणीला किरकोळ दुखापत झाली.