
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वीदेखील एप्रिल महिन्यात ईडीने सत्येंद्र जैन यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपने आम आदमी पार्टीला लक्ष्य केले होते.
‘आप’ने मात्र जैन निर्दोष असल्याचा दावा केला होता. तसेच पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक केली जाणार असल्याची मला माहिती मिळाली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर आता ईडीने जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. जैन हे हिमाचलच्या निवडणुकीत सक्रिय राहू नयेत म्हणूनच ही सूडबुद्धीची कारवाई केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.


























































