दिल्ली जगातील सर्वात प्रदुषित शहर, मुंबईचा क्रमांक टॉप 10 मध्ये

1204

दिल्ली जगातील सर्वात प्रदुषित शहर आहे. तर मुंबईचा क्रमांक प्रदुषित शहरांत टॉप 10 मध्ये आहे. स्कायमेटने जारी केलेल्या एका अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.


गेल्या काही दिवसांत दिल्लीत वातावरण खराब झाले आहे. सामान्य नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत असून दिल्लीत ऑक्सिजन घेण्यासाठी दुकानही सुरू करण्यात आले आहे. अशा वेळी दिल्ली जगातील शहर सर्वात प्रदुषित शहर असल्याचे स्कायमेट या संस्थेने म्हटले आहे.

जगातील टॉप 10 प्रदूषित शहरात हिंदुस्थानातील तीन शहरांचा समावेश आहे. त्यात दिल्लीचा क्रमांक प्रथम, कोलकात्याचा क्रमांक पाचवा तर मुंबईचा क्रमांक 9 वा आहे.

स्कायमेटच्या अहवालात नमूद केल्यानुसार दिल्लीत सातत्याने हवेचा स्तर खाली जात आहे. पहिल्यांदा दिल्लीत इतकी वाईट स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत 13 ठिकाणी एअर प्युरिफायर टॉवर लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या