
दिल्ली मेट्रोने एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइनवर ट्रेनमध्ये मोफत हायस्पीड वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोच्या 22.7 किलोमीटर लांब असलेल्या या लाइनवर सहा मेट्रो स्टेशन आहेत. या वायफाय सेवेचे उद्घाटन ट्रेनमध्ये करण्यात आले.
धावत्या ट्रेनमध्ये ही सेवा कशा पद्धतीने चालतेय हेदेखील पडताळून पाहण्यात आले. ही सेवा कार्यरत झाल्यानंतर लगेच प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक मंगू सिंग यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.























































