मोदींच्या ‘त्या’ विधानावरून सोशल मीडियावर गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या एका विधानावरून सोशल मीडियावरून प्रचंड गदारोळ झाला. इतकेच नाही तर विरोधकांनीही मोदींना लक्ष्य केले. हल्ल्याआधीचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ञ होते. परंतु हिंदुस्थानी विमानांना रडारपासून वाचवण्यासाठी अशा हवामानाचा फायदाच होऊ शकतो असा सल्ला मीच दिला होता, अशा प्रकारचे विधान मोदी यांनी केले होते.

मोदींचे ते विधान गुजरात भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरूनही शेअर करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावरून भाजपला ट्रोल करण्यात आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही ट्विटरवरून मोदींच्या विधानावर टीका केली. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांनीही आपली मते ट्विटरवरून मांडली.

भाजपने ट्विट हटवले

हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तज्ञही हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात होते. त्यावेळी हिंदुस्थानी विमानांना हल्ल्यापासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदाच होऊ शकतो, असा सल्ला मीच दिला होता. हे मोदींचे विधान गुजरात भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आले होते. परंतु मोदींना सोशल मीडियावर चोहोबाजूंनी ट्रोल केल्यानंतर आणि विरोधकांनीही त्यांना निशाणा बनवल्यानंतर अखेर ते ट्विट हटवण्यात आले.