
अयोध्येतील राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जो खटला सुरू आहे. त्याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्याचा अंतिम निकाल 9 नोव्हेंबर रोजी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबई झालेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत काही सूचना केल्या. या निकालानंतर देशात कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते. काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत संयम राखावा असे आवाहन त्यांनी केले.

























































