अमली पदार्थप्रकरणी नेस वाडिया यांना शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सुप्रसिद्ध उद्योगपती नस्ली वाडिया यांचे पुत्र आणि हिंदुस्थानातील सर्वात मोठय़ा धनाढय़ कुटुंबातील एक असलेल्या नेस वाडिया यांना जपानमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मात्र काही अटींवर त्यांची सुटका करीत ही शिक्षा 5 वर्षांपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जपानच्या सप्पोरो न्यायालयाने घेतला.