निर्भया प्रकरण – मित्र पैसे घेऊन देत होता मुलाखती, आरोपीच्या पित्याचा आरोप

1362
प्रातिनिधिक फोटो

2012 साली संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार व हत्याप्रकरणात नवीन खळबळजनक माहिती समोर येत आहे. याप्रकरणातील एका आरोपीच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यात निर्भया प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या तिच्या मित्राने पैसे घेऊन खोट्या बातम्या मीडियावाल्यांना दिल्या. पैसे घेऊन खोटी साक्षही त्याने दिली असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ही तक्रार आरोपी पवन कुमार गुप्ता याच्या वडिलांनी हीरा लाल गुप्ता याने केली आहे. पवनकुमार सध्या दिल्लीतील मंडोली येथील जेल क्रमांक 14 मध्ये आहे. याप्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या मुकेश, अक्षय कुमार सिंह, विनय कुमार शर्मा यातील पवन हा एक आरोपी आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, 12 ऑक्टोबर 2019 ला सोशल मीडियाच्या माध्यमातूम समजले की निर्भयाचा एकमेव साक्षीदार असलेला मित्र पैसे घेऊन वृत्त वाहीन्यांना मुलाखती द्यायला जात होता.

या तक्रारीमध्ये काही वृत्तवाहिन्यांमधील वरिष्ठांची नावे नमूद करण्यात आली आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या मॅनेजिंग एडीटरनेच निर्भयाचा मित्र  पैसे घेऊन मुलाखती देत होता असा दावा केल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले आहे. याप्रकरणाचे स्टींग केल्याचेही या एडीटरने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र त्यावेळी प्रकरण ऑन एअर केल्यास आरोपींना त्याचा फायदा झाला असता, असे या एडीटरने म्हटल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या