नुसरत जहांने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या?

1359

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि नुसरत जहां यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सोमवारी त्यांना घरी सोडण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच पतीबरोबरचे रोमँटीग फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणारी नुसरत आजारी पडल्याचे ऐकून तिचे चाहतेही नाराज झाले. पण श्वसनाचा त्रास होत असल्याने नाही, तर झोपेच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागल्याची महिती समोर येत आहे.

टी व्ही 9 भारतवर्षच्या हवाल्याने एका हिंदी वृत्तसंकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार अपोलो रुग्णालयाने फूल बागान पोलीस ठाण्यात नुसरत जहां यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यात नुसरत यांनी मर्यादेपेक्षा अधिक झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे नुसरत यांनी पती निखिल यांच्या वाढदिवशीच झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची चर्चा आहे. यावर नुसरतच्या कुटुंबीयांनी आणि निखिल यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. नुसरत यांची तब्येत खराब झाल्याने त्या सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनासही उपस्थित राहू शकल्या नाहीत.

 

आपली प्रतिक्रिया द्या