दहशतवादामुळे एक लाख कोटी डॉलर्स इतके नुकसान!

277

दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे सुमारे एक ट्रिलियन म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्स इतके नुकसान होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्रिक्स’ संमेलनात बोलताना सांगितले. दहशतवाद हा विकास, शांती आणि समृद्धीसाठी सर्वात मोठा धोका असून त्यामुळे विकसनशील देशांचा आर्थिक वृद्धी दर 1.5 टक्क्यांनी कमी झाला आहे, असेही ते म्हणाले.

दहशतवादाचा संघटितपणे सामना करण्यासाठी धोरण बनवण्यास ब्रिक्स संमेलनात विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दहशतवाद, दहशतवाद्यांना निधी पुरवणे, अमली पदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारीमुळे निर्माण होणाऱया वातावरणाचा फटका व्यापारावर होतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होते.’ ब्रिक्स देशांनी व्यापार आणि गुंतवणुकीवर अधिक लक्ष देण्याची गरजही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. ब्रिक्स समूहामध्ये हिंदुस्थानसह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. जगाच्या आर्थिक विकासामध्ये ब्रिक्स देशांचे जवळपास 50 टक्के योगदान आहे, परंतु ब्रिक्स देशांमध्ये जागतिक व्यापारापैकी फक्त 15 टक्केच व्यापार होतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या