
दिल्ली विधानसभा निवडणुकांचा दिवस अखेर उजाडला असून दिल्ली कुणाची या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. दिल्लीत ‘आप’चा झाडू चालणार असे सर्व एक्झिट पोल सांगत होते. सुरुवातीचा कौल पाहता असेच चित्र आहे. मात्र भाजपनेही गेल्यावेळेपेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडे तीन जागा होत्या. मात्र यंदाचे सुरुवातीचे कल पाहाता भाजपला 13 जागांवर आघाडी मिळालेली आहे. ही केवळ आघाडी आहे, अंतिम चित्र नाही, तेव्हा आकडेवारी बदलण्याची शक्यता आहे.
कोणत्या जागांवर भाजप पुढे?
नरेला मतदार संघातून भाजपचे नील दमन खत्री आघाडीवर आहेत. रोहिणी मतदार संघातून विजेंदर गुप्ता आघाडीवर आहेत. मुस्तफाबाद येथून जगदिश प्रधान आघाडीवर आहेत. घोंडा येथे अजय महावर हे पुढे आहेत. शालिमार बाग येथे रेखा गुप्ता पुढे आहेत. मुंडका येथे आझाद सिंग हे आघाडीवर आहेत. कृष्णानगर येथून डॉ. अनिल गोयल हे पुढे आहेत. विश्वास नगर येथून ओम प्रकाश शर्मा हे आघाडीवर आहेत. छत्तरपूर येथे ब्रह्म सिंग तनवर हे पुढे आहेत.
Live Update जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

























































