रोहित शेखरचा मृत्यू गुदमरून, हत्येचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याचा मृत्यू गुदमरून झाल्याचे ऑटोप्सी अहवालानंतर शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिल्ली क्राईम ब्रँचकरून केला जाणार आहे.

न्यायालयीन लढाईनंतर तिवारी यांनी रोहित याला आपला मुलगा म्हणून स्वीकारले होते. तीन दिवसांपूर्वी रोहितचा साकेत येथील डिफेन्स कॉलनीतील त्याच्या घरात गूढ अवस्थेत त्याचा मृत्यू झाला होता. रोहित याचा 11 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, लग्नाचा वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

रोहीतचा मृत्यू नैसर्गिक,आईचा दावा

 मंगळवार, 16 एप्रिलला दुपारी रोहितच्या नाकातून रक्त वाहू लागले होते. त्याची माहिती नोकराने रोहितची आई  उज्ज्वलाला दिली होती. त्यानंतर त्याला दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तिथे मृत घोषित केले. त्यावेळी माझ्या मुलाचा मृत्यू संशयास्पद नसून नैसर्गिक आहे. त्यात गूढ असे काही नाही. रोहितचा मृत्यू कशाने झाला, त्याची कारणे मी नंतर देईन, असेही त्याची आई म्हणाली होती.