‘रॉ’ च्या प्रमुखपदी सामंत गोयल यांची नियुक्ती

24

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांची नियुक्ती रॉच्या प्रमुखपदी करण्यात आली आहे. तर आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांच्याकडे गुप्तचर संस्थेच्या संचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या सामंत गोयल यांनीच बालाकोट एअरस्ट्राईकची योजना आखली होती. तर अरविंद कुमार हे कश्मीर विषयक प्रश्नांचे तज्ज्ञ आहेत. ते देखील 1984 बॅचचे असून आसाम -मेघालय कॅडरचे ते आयपीएस अधिकारी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या