कश्मीरात बर्फवृष्टी, दिल्लीत पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rain-in-delhi
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर/ नवी दिल्ली

जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज जोरदार बर्फवृष्टी झाली. दुसरीकडे राजधानी दिल्लीत आज विचित्र हवामान होते. सकाळी दाट धुके होते. यानंतर पर्जन्यवृष्टी झाली. तसेच दिल्लीसह संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात तापमान खूपच खाली आल्याने कडाक्याची थंडी पडली आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये धुक्याचे सावट आल्याने सिंगापूर, गोव्याहून येणाऱ्या विमानांना आपला मार्ग बदलायला लावून त्यांना चेन्नईकडे पाठवले. या विमानतळावर आज तब्बल 50 विमानांना विलंब झाला.