दिल्लीत मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना; वृक्ष कोसळून चौघांचा मृत्यू

दिल्ली, नोएडासह संपूर्ण एनसीआरमध्ये शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाट सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळतीत झाले आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. जाफराबाद कलां परिसरात सुरू असलेल्या जोरदार वादळीवाऱ्यामुळे एक मोठा कडुलिंबाचा वृक्ष कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना द्वारका जिल्ह्यातील खड़खड़ी नहर गावाlत घडली आहे. येथे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील एका घराच्या शेजारी असलेले एक मोठे कडुलिंबाचे झाड त्या घरावर पडले. त्यामुळे या घरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये एक महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

जनजीवन विस्कळीत

दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने (IMD) दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे आणि पुढील काही तासांत 70-80 किमी प्रतितास वेगाने वादळ, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना घरातच राहण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; 40 विमान फेऱ्यांना फटका, रेड अलर्ट जारी