नवी दिल्लीत संशयिताला अटक; सांकेतिक भाषेतील चिठ्ठी सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीच्या संसद भवन परिसरातील विजय चौक भागात दिल्ली पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सांकेतिक भाषेत विशिष्ट कोडवर्डमध्ये लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीबाबत पोलीस संशयितांची चौकशी करत आहे. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

संसद भवन परिसरात हा संशयित आढळल्यानंतर परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. हा संशयित कश्मीरी युवक असल्याची माहिती मिळाली आहे. तो संशयास्पद स्थितीत संसद भवन परिसरात फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना संशय आल्याने त्याची तपासणी केली असता सांकेतिक भाषेतील चिठ्ठी त्याच्याकडे सापडली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. संशयिताची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.