दिल्ली – तिहार तुरुंगात कैद्याने केली कैद्याची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

दिल्लीतील तिहार तुरुंगात एका तरुण कैद्याची चाकू खुपसून अन्य काही कैद्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. दिलशेर असे त्या कैद्याचे नाव असून यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा तिहार तुरुंगातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आशियातील सर्वात मोठे व सुरक्षित असा तुरुंग म्हणून तिहारची ख्याती आहे. दिलशेर हा रात्री झोपलेला असताना काही कैद्यांनी त्याची चाकू खुपसून हत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तुरुंगात खून झाल्याचे समोर येताच एकच खळबळ उडाली. मात्र ही हत्या कुणी केली ते अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान दिलशेरच्या कुटुंबीयांनी तुरुंगाती कैदी वेद प्रकाश, नौशाद आणि फैज आलम यांनी दिलशेरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान तुरुंगात चाकू कसा आला व दिलशेरची हत्या कुणी केली याचा पोलीस तपास करत आहेत.