रेल्वेत चहा,नाश्ता आणि जेवणासाठीही जादा पैसे मोजावे लागणार

851

जर तुम्ही कुठे लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणार असाल तर सोबत दोन पैसे जास्त ठेवा. कारण आतापर्यंत रेल्वेत स्वस्तात मिळणाऱ्या चहा ,नाश्ता आणि जेवणासाठी तुम्हांला जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कारण रेल्वे बोर्डाने पर्यंटन आणि खान पान विभागाला सूचनापत्र पाठवले आहे. ज्यात राजधानी, शताब्दी,  दुरंतो रेल्वेमध्ये चहा, नाश्ताबरोबरच जेवणाचे दर वाढवले जाणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे या गाड्यांचे तिकीट घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

राजधानी, दुरंतो आणि शताब्दी या रेल्वेगाडीतील प्रवासासाठी नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यात सेकंड एसीमधील प्रवाशांना चहासाठी 10 रुपयांच्या जागी 20 रुपये द्यावे लागणार आहेत. तर स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी 15 रुपये दर ठेवण्यात आले आहेत. दुरंतोच्या स्लीपर क्लासमध्ये आधी 80 रुपयांना मिळणारा नाश्ता आणि जेवण आता 120 रुपयांना मिळणार आहे. तर संध्याकाळच्या चहासाठी प्रवाशांना आधी 20 रुपये द्यावे लागत होते ते आता 50 रुपये होणार आहेत.

येत्या 15 दिवसात रेल्वेच्या मेन्यू आणि शुल्क सिस्टममध्ये हे नवीन दर अपडेट केले जाणार आहेत. तर तीन महिन्यांनंतर म्हणजेच 120 दिवसांनंतर हे दर लागू करण्यात येणार आहेत. त्यानंतर राजधानीच्या फर्स्ट एसी कोचमध्ये 145 रुपयांऐवजी 245 रुपये प्रवाशांना मोजावे लगणार आहेत. शाकाहारी जेवण जे आधी 50 रुपयांना मिळायचे ते नवीन दर लागू झाल्यावर 80 रुपयांना मिळणार आहे. तसेच मांसाहारी प्रवाशांना अंडा बिर्य़ाणीसाठी 90 रुपये आणि चिकन बिर्याणीसाठी 110 रुपये द्यावे लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या