17 फेबुवारीपासून दिल्ली विद्यापीठ सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये करोना प्रादुर्भावाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र दिल्ली विद्यापीठ सुरू होण्याबाबतच्या तारखांची स्पष्टता न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. आता दिल्ली विद्यापीठ पुन्हा सुरू करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठ 17 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर प्रा. रजनी अब्बी यांनी यासंदर्भात बुधवारी घोषणा केली.