हेरगिरीनंतर व्हॉट्सऍपचे डाऊनलोड 80 टक्क्यांनी घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायलच्या एका कंपनीच्या ‘पिगासस’ सॉफ्टवेअरद्वारे जगभरातून व्हॉट्सऍपवरील बडय़ा आणि व्हीआयपी 1400 युजर्सचा डेटा हॅक करण्यात आल्याच्या घटनेनंतर व्हॉट्सऍप डाऊनलोड करण्याचे प्रमाण 80 टक्क्यांनी घटल्याचे उघड झाले आहे. येथील ‘मोबाईल डेटा ऍनालिटिक्स ऍण्ड इंटेलिजेन्स’ या कंपनीने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे.

यामुळे ‘सिग्नल’ आणि ‘टेलिग्राम मेसेंजर’ ही ऍप्स डाऊनलोड करण्याचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या वाढल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हेरगिरी उघड होण्याआधी व्हॉट्सऍप डाऊनलोड करण्याचे प्रमाण 89 लाख होते. मात्र 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत हा ऍप केवळ 18 लाख युजर्सनेच डाऊनलोड केल्याचे स्पष्ट झाले आहे. पिगासस स्पायवेअरद्वारे जगभरातील 1400 बडय़ा लोकांचे डेटा हॅक करण्यात आले होते. यात राजकीय नेते, मोठे अधिकारी आणि पत्रकारांचाही समावेश होता. हेरगिरीचा हा प्रकार उघड झाल्यामुळे व्हॉट्सऍप डाऊनलोड करणाऱयांची संख्या घटल्याचे सांगण्यात आले.