#CORONA चीनी समजून मणिपुरी तरुणीच्या तोंडावर थुंकले

1126

इशान्य हिंदुस्थानातील नागरिक हे हिंदुस्थानचाच भाग असले तरी दिसायला ते चीनी लोकांसारखे असल्यामुळे अनेकदा त्यांना चीनी, नेपाळी म्हणून हिणवले जाते. सध्या जगभरात चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे चीनवर संपूर्ण जगाचा रोष आहे. दिल्लीत एका मणिपूरी तरुणीला चिनी असल्याचे समजून तिच्यावर थुंकण्यात आले. तसेच या तरुणीला कोरोना देखील म्हटले गेले आहे.

उत्तर दिल्लीतील विजयनगर येथे ही घटना घडली. सदर तरुणी बाजारात फिरत असताना तिचे एका व्यक्तीशी भांडण
झाले. त्यानंतर तो व्यक्ती तिला कोरोना, चीनी म्हणून हिणवू लागला. हे भांडण वाढल्यानंतर तो तिच्या अंगावर थुंकला व त्याची स्कूटी घेऊन पसार झाला. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या घटनासथळाचे सीसीटीव्ही तपास असून त्या आरोपीचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या